पहिली खेलो इंडिया बिच सेपक टकारा क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघ रवाना

पहिली खेलो इंडिया बिच सेपक टकारा क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघ रवाना

परभणी : भारत सरकार खेलमंत्रालय व खेलो इंडिया वतीने 1 ल्या खेलो इंडिया बीच सेपक टकारा क्रीडा स्पर्धा (दिव ) येथे दि. 19 ते 24 मे दरम्यान संपन्न होणार आहेत. होणाऱ्या स्पर्धेसाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड वतीने महाराष्ट्र राज्य बीच सेपक टकारा संघाचे प्रशिक्षण शिबिर दि. 12 ते 16 मे दरम्यान संपन्न झाले. 1 ल्या खेलो इंडिया बिच सेपक टकारा क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य बिच सेपक टकारा संघ अलिबाग बिच येऊन दिव दमन साठी रवाना झाला.

या संघास शुभेच्छा देण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ, क्रीडा अधिकारी आकाश डोंगरे, महाराष्ट्र राज्य प्रशिक्षक गणेश माळवे, निवड समिती सदस्य वैभव शिंदे उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य सेपक टकारा संघ: लेखांशु लडके, सौरभ कोसुळकर, ओम मुळे (वर्धा) इर्शाद सागर , समीर थूल ,मोहम्मद अली ,मोहम्मद सोहेल (नागपूर)अमोल राठोड , सुकुमार तिवारी (नाशिक) सुदेश कांबळे (नांदेड) फैझान शेख (जळगाव), ऋषिकेश यादव (ठाणे) प्रशिक्षक: गणेश माळवे (परभणी) सह प्रशिक्षक दर्शन हस्ती (वर्धा) संघ व्यवस्थापक विकास माने, क्रीडा अधिकारी (पुणे) .

क्रीडा आयुक्त हिरालाल सोनवणे, सहसंचालक क्रीडा सुधीर मोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ, क्रीडा उपसंचालक उदय जोशी, नवनाथ फडतरे, सुहास पाटील, क्रीडा अधिकारी अरुण पाटील ,सेपक टकारा संघटनेचे राज्य अध्यक्ष विपीन कामदार, राज्य सरचिटणीस डॉ.योगेंद्र पांडे, राज्य उपाध्यक्ष प्रविण कुपटीकर, डॉ .अमृता पांडे, डॉ .विनय मुन,शेख चाँद, रवि बकवाड,परवेज खान, अभिनंदन करुन पुढील स्पर्धेस शुभेच्छा दिल्या.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!