खरीप हंगाम : दर्जेदार खते, बियाणांचा पुरवठा करावा
सेलू तालुका दबाव गटाची पालकमंत्र्यांकडे मागणी
सकाश न्यूज नेटवर्क, सेलू : खरीपाच्या हंगामात बियाणे, खते औषधीबाबत जर शेतकऱ्यांची अडवणूक करतील, चढ्या भावाने विक्री करतील. अशा संबंधित विभागातील अधिकारी व व्यापारी यांच्यावर तत्काळ कारवाई केली करावी तसेच शेतकऱ्यांना दर्जेदार खते, बियाणे, औषधीचा पुरेसा पुरवठा करावा, अशी मागणी पालकमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर यांना सेलू तालुका दबाव गटाच्या वतीने निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
यासंदर्भात १९ मेरोजी निवेदन देण्यात आले आहे. खरीपाचा हंगाम तोंडावर आहे. मागील काही वर्षे परभणी जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये अप्रमाणित खते औषधें आणि यांची सर्रास विक्री झाली. तसेच कापूस काही बियाणे व डीएपी, युरिया आदींचा राजरोसपणे कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात आला. त्यामुळे आधीच शेतमालाला योग्य भाव नाही व त्यावर पुन्हा
चढ्या भावाने बियाणे, खते खरेदी यामुळे जिल्ह्यातील शेतकरी अत्यंत परेशान झाला होता.
जिल्ह्यातील कृषी खात्यांचे व्यापारी वर्गावर कसल्याच प्रकारचे नियंत्रण नव्हते. नियमितेबाबत आढावा घेतला जात नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने खते, बियाणे मिळेल त्या चढ्या भावात ऐन पेरणीच्या वेळेस खरेदी करावा लागला. व्यापारी व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे सर्व काही करून हात वर केले.मोठ्या प्रमाणात काळाबाजाराकडे दुर्लक्ष करण्यात आले. यावर्षी देखील हीच अवस्था निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही कृषी विभागाच्या वतीने तपासणी पथक स्थापन होणे आवश्यक आहे.
तसेच या बाबतीत जे कोणी खरीपाच्या हंगामात बियाणे, खते औषधीबाबत जर शेतकऱ्यांची अडवणूक करतील, चढ्या भावाने विक्री करतील. अशा संबंधित विभागातील अधिकारी व व्यापारी यांच्यावर तत्काळ कारवाई केली पाहिजे. या संबंधीची सक्त आदेश संबंधित कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात यावे, अशी मागणी सेलू तालुका दबाव गटाच्या वतीने पालकमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर यांना निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. निवेदनावर श्रीकांत वाईकर, ओमप्रकाश चव्हाळ, इसाक पटेल, गुलाब पौळ, मुकुंद टेकाळे, देवराव दळवे, दिलीप मगर, नारायण पवार, लिंबाजी कलाल, योगेश सुर्यवंशी,उमेश काष्टे, सतिश काकडे ,सुभाष काकडे, आबासाहेब भुजबळ, लक्ष्मण रामचंद्र कांबळे, भारत रवंदळे, दताराव कांगणे, रौफ भाई, सय्यद जलाल, अजित मंडलिक, सुधीर आधाव, राजेंद्र केवारे, रामचंद्र आधाव, उध्दव सोळंके, गणेश सोळंके, रामेश्वर शेवाळे, दिलीप शेवाळे, भाऊसाहेब सोनवणे आदींच्या सह्या आहेत.