सेलू तालुक्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला खिंडार
अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात
परभणी : राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत १८ मेरोजी सेलू् तालुक्यातील कुपटा, बरसाले डिग्रस, कुंभारी, सेलवाडी, नागठाणा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षातील प्रमुख कार्यकर्ते, सरपंच, पक्ष पदाधिकारी यांचा माजी जिल्हा परिषद सभापती अशोक काकडे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला.
पालकमंत्री यांच्या सेलू येथील संपर्क कार्यालयात हा सोहळा पार पडला. यामध्ये कुपटा येथील सुखानंद सोळंके ,राहुल देव सोळंके, श्रीराम कुलकर्णी , अनिरुद्ध सोळंके, सागर पालंबे , प्रभाकर काकडे , माणिक पोटे, बरसाले डिग्रस : बाळासाहेब बरसाले, माणिकराव बुरे, हरिभाऊ तारडे, संतोष आरबाड, पांडुरंग बरसाले , कैलास बुरे, ज्ञानेश्वर लेवडे, प्रकाशराव बरसाले, योगेश बरसाले, आनंद निर्वळ, गणेश बुरे, ज्ञानेश्वर बरसाले, शाहू मामा तारडे, अक्षय बुरे, पंडितराव बरसाले, अशोक वामने, विकास बोराडे, अशोक बुरे, एकनाथ बुरे, श्रीहरी बरसाले, धनंजय कवरखे, विठ्ठल बरसाले, शेलवाडी : सुरेशराव निर्वळ, राजेभाऊ निर्वळ, दिलीपराव निर्वळ, दिनकरराव निर्वळ, लक्ष्मणराव चोरमले, तातेराव निर्वळ, अशोकराव निर्वळ, विष्णुपंत निर्वळ, नागठाणा-कुंभारी : अंकुशराव खरात, मा. सरपंच नागठाणा कुंभारी ,बाबासाहेब शिंदे, लक्ष्मण शिंदे, दिगंबर शिंदे, दत्ताराव मोगल आदींचा समावेश आहे.
००००