औषधनिर्माण अधिकाऱ्यांचा उपराष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

औषधनिर्माण अधिकाऱ्यांचा उपराष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

सेलूचे अविनाश कांबळे आणि हिंगोलीचे विजयकुमार पोपळाईत यांचा गौरव

सेलू : इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस (IIPS) च्या 2024-25 च्या पदवीदान समारंभात जिल्ह्यातील शासकीय सेवेत असलेल्या औषधनिर्माण अधिकाऱ्यांचा भारताचे उपराष्ट्रपती यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.
इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस (IIPS) च्या वतीने दिनांक 28 मे 2025 रोजी मुंबई येथील गोवंडी, देवनार येथील 2024-25 चा पदवीदान समारंभ पार पडला..

या विशेष दीक्षांत पदवी वितरण समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून भारताचे उपराष्ट्रपती श्री. जगदीप धनखड प्रमुख उपस्थित होते. त्यांच्यासोबत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण तसेच रसायन आणि खत मंत्रालयाच्या राज्यमंत्री श्रीमती अनुप्रिया पटेल, महाराष्ट्र राज्याचे पणन व राज्य शिष्टाचार मंत्री श्री. जयकुमार रावल, IIPS चे चेअरमन डॉ. नाग दवे, तसेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरचे संचालक डॉ. थोरात यांचीही उपस्थित होते.
या पदवी दीक्षांत समारंभात

परभणी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील औषधनिर्माण अधिकारी श्री.विजयकुमार पोपळाईत (रा. हिंगोली) श्री.अविनाश कांबळे (रा. सेलू) यांना राष्ट्रीय जनआरोग्य प्रशिक्षण आणी संशोधन केंद्र मुंबई अंतर्गत हॉस्पिटल मॅनेजमेंट हि पदव्युत्तर पदवी भारताचे उपराष्ट्रपती माननीय जगदीप धनखड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली असून सर्वांना लवकरच उपराष्ट्रपती भवन दिल्ली येथे सत्कारासाठी आमंत्रित केले आहे. जिल्ह्यातील औषधनिर्माण अधिकारी संवर्गासाठी हि अत्यंत अभिमानाची बाब ठरली असून औषधनिर्माण अधिकारी संघटनेचे अरुण पेडगावकर, विजय ढाकणे, जयदीप नाईक, चंद्रशेखर देशमुख आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!