परभणी : सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा सोमवारचा ( सहा जून) परभणी, सेलू, जिंतूर दौरा प्रकृतीच्या कारणास्तव रद्द करण्यात आला आहे.मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सेलू व जिंतूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. कार्यकर्ता मेळाव्याला मुंडे मार्गदर्शन करणार होते. परंतु प्रकृतीच्या कारणास्तव दौरा रद्द केल्याचे कळविण्यात आले आहे.
***