अ.भा. ग्राहक पंचायतच्या प्रांताध्यक्षपदी डॉ. विलास मोरे
छत्रपती संभाजीनगर : अखिल भारतीय ग्राहक पंचायत देवगिरी प्रांताध्यक्षपदी सेलू जि.परभणी येथील डॉ. विलास विष्णुदास मोरे यांची दुसऱ्यांदा अविरोध निवड झाली. सचिवपदी ओंकार जोशी तर रामदास ठोंबरे यांची प्रांत संघटन मंत्री म्हणून निवड झाली.
छत्रपती संभाजीनगर येथे सोमवारी, 9 जून 2025 रोजी देवगिरी प्रांत कार्यकारिणीच्या बैठकीत पश्चिम क्षेत्रीय संघटन मंत्री नितीन काकडे यांनी केंद्राच्या निर्देशानुसार पुढील तीन वर्षासाठी या नियुक्त्या जाहीर केल्या. प्रांताध्यक्ष डॉ. विलास मोरे यांनी उर्वरित कार्यकारिणी घोषित केली.
उपाध्यक्षपदी प्रा. डॉ. स्मिता अवचार, धनंजय मुळे, सहसचिवपदी एड. संगमेश्वर रासुरे, प्रशांत खानापूरकर, कोषाध्यक्षपदी एड. संगीता धुमाळ (तांबट), प्रांत कार्यालय प्रमुख रवींद्र पिंगळीकर, महिला जागरण प्रमुखपदी मंजुश्री ढेपे, पर्यावरण आयाम प्रमुख डॉ संगीता आवचार, विधी आयाम प्रमुख एड संजय केकान, रोजगार आयाम प्रमुख किरण बोचरे, दामोदर पारेख, प्रचार व प्रसार प्रमुख विजय चौधरी, विधी आयाम प्रमुख एड संजय केकान तर सदस्यपदी महेश ढवळे, एड दत्तात्रय पाटील, राजेश मेहता यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.