कान्हेकर शारदा विद्यालयात प्रवेश महोत्सव

कान्हेकर शारदा विद्यालयात प्रवेश महोत्सव

सुभाषराव काळे यांच्यातर्फे शैक्षणिक साहित्यासाठी दहा हजारांची देणगी

सेलू : येथील कै.सौ.राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी  प्रवेश महोत्सव व मोफत पाठ्यपुस्तक वाटप कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून सारंगी गल्ली देवस्थानचे विश्वस्त तथा सेवानिवृत्त कर्मचारी सुभाषराव काळे उपस्थित होते. त्यांनी शैक्षणिक साहित्यासाठी दहा हजार रुपयांची देणगी या वेळी दिली.  अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक प्रल्हादराव कान्हेकर, प्रमुख अतिथी म्हणून बबन आप्पा झमकडे, मुख्याध्यापक बी.आर.साखरे यांची प्रमुख उपस्थिती होती.  उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत करून पाठयपुस्तकांचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक भरत रोडगे , सूत्रसंचालन सुभाष मोहकरे तर संदीप जुमडे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक डी.डी.शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहिदास चव्हाण,अभिमान पाईकराव, विजय हिरे, सौ उषा कामठे , नानासाहेब भदर्गे, विजय अंभुरे, श्रीमती भारती मुळे, साडेगावकर, फुलारी यांनी परिश्रम घेतले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!