धन्वंतरी ज्ञानाई वारकरी दिंडी : आरोग्य सेवेसाठी डॉक्टरांची वारी
सेलूतून आळंदीकडे प्रस्थान, शिवसेना डॉक्टर सेलचा उपक्रम
परभणी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि शिवसेना डॉक्टर सेलच्या राज्य कार्यकारिणीच्या पुढाकाराने आषाढी वारीतील वारकऱ्यांच्या आरोग्यसेवेसाठी धन्वंतरी ज्ञानाई वारकरी दिंडी या महाराष्ट्रातील पहिल्या डॉक्टरांच्या वारीचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी, १७ जून रोजी सेलू येथील दिंडीने आळंदीकडे प्रस्थान केले आहे.
सेलू डॉक्टर्स असोशिएशनचे अध्यक्ष डॉ बाळासाहेब जाधव यांच्याहस्ते उद्घाटन झाले. या वेळी शिवसेना डॉक्टर सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.अनिकेत जोगदंड, डॉ.शेषनारायण केवारे, डॉ.उमेश गायकवाड, डॉ.परेश बिनायके डॉ.प्रकाश पुरी, डॉ.श्रीनिवास मोरे, डॉ.दीपक सासवडे, डॉ.ज्ञानेश्वर कारके, डॉ.सचिन काळे, डॉ.किरण गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी दिंडीचे नियोजन प्रमुख तांगडे महाराज यांचा सत्कार करण्यात आला. अहोरात्र काम करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील विविध घटकांना त्यांच्या व्यस्त आणि तणावपूर्ण जीवनशैलीतून थोडीशी उसंत मिळावी तसेच त्यांच्यामध्ये भक्तीभाव, प्रेम, वात्सल्य, सात्विकता वृद्धिंगत व्हावी आणि विशेषत: वारकऱ्यांना आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. २० जूनरोजी पुणे येथे शिवसेना डॉक्टर सेलचे २०० हून अधिक पदाधिकारी,सदस्य उपस्थित राहणार आहेत. राज्यातील डॉक्टरांनी दिंडीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक तथा शिवसेना डॉक्टर सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.अनिकेत जोगदंड यांनी केले आहे. या वेळी परभणी जिल्हा संपर्कप्रमुख डॉ.अशोक नाईकनवरे, डॉ.अनुराग जोगदंड, तालुकाप्रमुख डॉ.योगेश बोराडे, डॉ.सोमेश्वर गजमल, फिजिओथेरपी सेलचे सुरेश लबडे, पॅरामेडिकल सेल प्रकाश दांगट, फार्मसी सेलचे गजानन नावडकर, बालाजी कळवे आदींची उपस्थिती होती.
अहोरात्र काम करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील विविध घटकांना त्यांच्या व्यस्त आणि तणावपूर्ण जीवनशैलीतून थोडीशी उसंत मिळावी तसेच त्यांच्यामध्ये भक्तीभाव, प्रेम, वात्सल्य, सात्विकता वृद्धिंगत व्हावी आणि विशेषत: वारकऱ्यांना आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. २० जूनरोजी पुणे येथे शिवसेना डॉक्टर सेलचे २०० हून अधिक पदाधिकारी,सदस्य उपस्थित राहणार आहेत. राज्यातील डॉक्टरांनी दिंडीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक तथा शिवसेना डॉक्टर सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.अनिकेत जोगदंड यांनी केले आहे.