जिजामाता शाळेत शालेय साहित्याचे वाटप
सेलू : येथील आंबेडकर नगर परिसरातील जिजामाता बाल विद्या मंदिर शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहात करण्यात आली. याप्रसंगी इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना गणवेश, पाठ्यपुस्तके, दप्तर, बास्केट, डबा, वह्या आणि लेखन साहित्याचे संच वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डी. व्ही. मुळे होते. सहसचिव बाबासाहेब चारठाणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्याध्यापक रविंद्र पाठक यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन मंगेश शेळके यांनी केले. सुनील राठोड यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजयमाला काळे, भगवान पावडे, कृष्णकांत खापरखुंटीकर, विष्णू कटारे आणि बाळू धनवे यांनी सहकार्य केले.