अपूर्वा पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे देदीप्यमान यश
सेलू: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्यामार्फत २० जून २०२५ रोजी जाहीर झालेल्या डिप्लोमा परीक्षेचा निकाल अपूर्वा पॉलिटेक्निक, सेलू संस्थेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यशाने संपादन केला आहे. सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल या तिन्ही शाखांतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट टक्केवारीसह उत्तीर्ण होत संस्थेची शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे.
संस्थेमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावलेले विद्यार्थी असे:
- गणगे गोकर्णा दत्तात्रय – ८७.०८% (प्रथम)
- डांगरे अभिनव गणेश – ८४.२२% (द्वितीय)
- चाळक अश्विनी राजेभाऊ – ८२% (तृतीय)
शाखांनुसार विशेष प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी:
सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग:
- कावले ओम – ७५.११%
- बारबिंड शरद – ७५%
- गंधाला पुष्पांजली – ७५%
- चव्हाण आकाश – ७०.६७%
- गुळवे शिल्पा – ७०%
मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग:
- डांगरे अभिनव – ८४.२२%
- रोडगे सुदर्शन – ७०.७८%
- साखरे कीर्ती विष्णू – ७६%
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग:
- गणगे गोकर्णा – ८७.०८%
- चालक अश्विनी – ८२%
- पवार लहू – ७६.५६%
- कवळे शिवानी – ७७.४७%
- सपाटे राजकुमार – ७५%
- पारधे महेश – ७७.७२%
- अर्दड श्रेयस – ७१.६१%
यावेळी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे बोलताना म्हणाले की, “अपूर्वा पॉलिटेक्निकचे विद्यार्थी प्रत्येक परीक्षेत गुणवत्ता सिद्ध करत आहेत. यावेळेचा निकालही आमच्यासाठी अत्यंत गौरवास्पद आहे. विद्यार्थी, पालक व शिक्षकांचे योगदान हेच आमच्या यशाचे खरे श्रेय आहे.” त्यांनी पुढे सांगितले, “संस्थेचे उद्दिष्ट नेहमी गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हेच राहिले आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश आमच्या शिक्षणपद्धती व प्रयत्नांचे फलित आहे. सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.”
या प्रसंगी श्रीराम प्रतिष्ठानच्या सचिव डॉ. सौ. सविताताई रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, प्राचार्य प्रा. अशोक बोडखे, उपप्राचार्य प्रा. गजानन जाधव, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक व इतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांचे कौतुक केले.