अध्यक्षपदी डॉ.संतोष मलसटवाड, विजेंद्र धापसे सचिव
मराठवाडा शिक्षक संघाची सेलू तालुका कार्यकारिणी जाहीर
सेलू : सेलू तालुका मराठवाडा शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी डॉ. संतोष मलसटवाड, उपाध्यक्ष सुभाष मोहकरे, सुनील राठोड, सचिव विजेंद्र धापसे, तर कोषाध्यक्षपदी प्रा.महेश कुलकर्णी यांची निवड करण्यात आली.
कार्यकारिणी निवडीसाठी सोमवारी, २३ जून रोजी जेष्ठ नेते उत्तमराव थोंबाळ यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील शिक्षकांची बैठक झाली. बैठकीस जिल्हाध्यक्ष यशवंत मकरंद, उपाध्यक्ष अमित मोगल, सचिव निशांत हाके, उपमुख्याध्यापक परसराम कपाटे, मुख्याध्यापक सिध्दार्थ एडके, केशव टाकळकर, शिवलिंग वावरे, यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन डॉ.काशिनाथ पल्लेवाड यांनी केले. यशस्वीतेसाठी व्यंकट तोरणाळे, डॉ.सुरेश हिवाळे, संध्या फुलपगार, बाबासाहेब गोरे, योगेश ढवारे आदींनी पुढाकार घेतला.बैठकीला सेलू तालुक्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते