रामा गायकवाड यांना ‘योगरत्न’ पुरस्कार
सेलू : सेलू येथील योग प्रशिक्षक रामा भगवानराव गायकवाड यांना २२ जून, रविवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित समारंभात २०२२ चा ‘योगरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलच्या आयुष विभागातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष डॉ. बाळासाहेब पवार उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक मनोज दांडगे उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. नितीन राजे पाटील, अध्यक्ष डॉ. सतीश कराळे, डॉ. बाबुराव कानडे, दिशा चव्हाण, प्रशांत सावंत, प्रा. कुणाल महाजन, मनोहर कानडे यांच्यासह योगशिक्षक आणि योग थेरपिस्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरस्काराबद्दल श्री.गायकवाडचे यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.