छत्रपती शाहू महाराज जयंती : जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन
सातवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन
परभणी : परभणी येथील सहायक आयुक्त, समाज कल्याण विभागातर्फे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती “सामाजिक न्याय दिन” म्हणून साजरी केली जात आहे. या निमित्ताने “शाहू महाराजांचे जीवन व कार्य” या विषयावर जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या निबंध स्पर्धेसाठी “राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जीवन व कार्य” हा विषय असेल. निबंधाची शब्दमर्यादा १,००० शब्दांपेक्षा जास्त नसावी. स्पर्धकांनी आपले निबंध ३० जून २०२५ पर्यंत कार्यालयीन वेळेत सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सामाजिक न्याय भवन, जायकवाडी वसाहत, कारेगाव रोड, परभणी येथे बंद पाकीटात सादर करावेत.
या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत:
- प्रथम बक्षीस: रु. ३,००१ व स्मृती चिन्ह
- द्वितीय बक्षीस: रु. २,००१ व स्मृती चिन्ह
- तृतीय बक्षीस: रु. १,००१ व स्मृती चिन्ह
- प्रोत्साहनपर बक्षीस: ११ विद्यार्थ्यांना प्रत्येकी रु. ५०१
समाज कल्याण सहायक आयुक्त राजू एडके यांनी आवाहन केले आहे की, सातवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे.