२७ वी राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धा : महाराष्ट्र राज्य संघाची घोषणा 

२७ वी राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धा : महाराष्ट्र राज्य संघाची घोषणा 

नवी मुंबई : २७ वी राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धा भाटपारा छत्तीसगड येथे दि. २६ जून ते 30 जून या कालावधीत होणार असून स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड चाचणी टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशनच्या मान्यतेने आणि नवी मुंबई टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशनच्या विद्यमाने क्राईस्ट अकॅडमी स्कूल अँड ज्यू कॉलेज, कोपरखैरणे येथे आयोजित करण्यात आली होती. या वेळी विविध गटातील महाराष्ट्र संघाची घोषणा करण्यात आली. निवड चाचणी करिता महाराष्ट्रातील नवी मुंबई, ठाणे, मुंबई, परभणी, हिंगोली, मुंबई उपनगर, पुणे, नाशिक, अमरावती अशा विविध जिल्ह्यातही खेळाडूंनी ज्युनिअर आणि सब ज्युनिअर गटात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

टेनिस व्हॉलीबॉल खेळाचे जनक व्यंकटेश वांगवाड यांचे या वेळी मार्गदर्शन लाभले. क्राईस्ट अकॅडमी स्कूलचे संचालक फादर जेसन यांनी  खेळाडूंसोबत संवाद साधला. राज्य सचिव गणेश माळवे, उपाध्यक्ष कोरडे, कोषाध्यक्ष डॉ.दिनेश शिगारम,  बालभारती शिक्षक तज्ञ प्रगती भावसार, नवी मुंबईचे सचिव वैभव शिंदे, अशोक शिंदे,आशिष ओबेरॉय, सचिन भोसले यांची उपस्थिती होती.

 

राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेले संघ याप्रमाणे : ज्युनिअर मुले: कृष्णा अहिरे विवेक साळुंखे ,प्रसाद महाले मयूर बोरसे ,प्रताप पौळ ,अनंत धापसेसब-ज्युनिअर मुले: ईश्वर मोरे,दिव्यांशु चांद ,वेदांत महामाने, गौरव चौधरी, मयूर निकम, विर पाटील. ज्युनिअर मुली : वेदिका बेंद्रे, मृणाली सरवदे , श्रेया सिंग सृष्टी शिंदे ,मान्यता जैन, अंकिता सरगर. सब- ज्युनिअर मिश्र दुहेरी :राजवीर भोसले, सोनाक्षी कदम, ज्युनिअर मिश्र दुहेरी :शिवम कदम ,श्रेया धावन, प्रशिक्षक :उज्वला शिंदे शिवदास खुपसे,गणेश आम्ले, संघ व्यवस्थापक : निलेश माळवे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!