राज्य तलवारबाजी स्पर्धेसाठी परभणी जिल्हा संघ रवाना

राज्य तलवारबाजी स्पर्धेसाठी परभणी जिल्हा संघ रवाना

सेलू : छत्रपती संभाजीनगर येथे २६ ते २९ जून दरम्यान होणाऱ्या राज्य चाईल्ड व मिनी तलवारबाजी क्रीडा स्पर्धेसाठी सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या प्रशिक्षण केंद्रातील ७ खेळाडूंचा परभणी जिल्हा संघ रवाना झाला आहे. महाराष्ट्र तलवारबाजी संघटना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने १० वर्षांखालील (चाईल्ड) आणि १२ वर्षांखालील (मिनी) गटांसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. परभणी जिल्ह्याच्या संघात शरद भूमकर, ईश्वरी गोरे, अर्णव डख, ईश्वरी डोंबे, अभिनव काष्टे, तेज चव्हाण, स्वयम लव्हाळे या खेळाडूंचा समावेश आहे. संघाला संजय भूमकर आणि जिजाभाऊ डख मार्गदर्शन करत आहेत. जिल्हा संघटनेचे अध्यक्ष ॲड. दीपकराव देशमुख, सचिव डॉ. पांडुरंग रनमाळ, मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक के. के. देशपांडे, पर्यवेक्षक रोहिदास मोगल, शंकर बोधनापोड, गणेश माळवे, प्रशांत नाईक, अनिल रावळे, सुशील जोरगेकर, मीरा डोंबे यांनी पुढील शुभेच्छा दिल्या.


Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!