सेलूमध्ये मुस्लिम समाजातील गुणवंतांच्या सत्काराचे आयोजन

सेलूमध्ये मुस्लिम समाजातील गुणवंतांच्या सत्काराचे आयोजन

सेलू : अल फलाह एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीतर्फे विविध परीक्षा व स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या मुस्लिम विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रविवार, २९ जून रोजी दुपारी १:३० वाजता महेश नगर येथील साई नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. सिरातून नबी निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धा, सामान्य ज्ञान आणि इस्लामिक क्विझ कॉन्टेस्टमधील विजेत्यांसह, दहावी, बारावी, नीट, सीईटी आणि इतर विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात सत्कार केला जाईल.

अल फलाह एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते शेख महेमुद कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. प्रसिद्ध व्याख्याते, मराठी मुस्लिम चळवळीचे संस्थापक तथा दंगा मुक्त महाराष्ट्र अभियानचे संयोजक शेख सुभान अली, प्रसिद्ध इस्लामिक स्कॉलर आर्किटेक्ट शेख अर्शद, आणि ऑल इंडिया आयडियल टीचर्स असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शेख रहिम हे प्रमुख वक्ते व पाहुणे म्हणून उपस्थित राहून सामाजिक व शैक्षणिक विषयांवर प्रबोधनात्मक मार्गदर्शन करतील. अल फलाह एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष इंजिनिअर अनीस कुरेशी, सचिव हाजी शफीक अली खान, आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि नागरिकांना या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.


Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!