ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे शिक्षण गुणवत्तापूर्ण

ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे शिक्षण गुणवत्तापूर्ण

गुणवंतांच्या सत्कारप्रसंगी मंगेश चिवटे यांचे मत

परभणी :  मेडिकल, इंजिनियर यांसारख्या क्षेत्रांसोबतच क्रीडा, संशोधन क्षेत्रातही करिअरच्या अनेक संधी आहेत. हे ओळखून ज्ञानसाधना प्रतिष्ठानने विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा वसा जपलेला आहे, असे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांनी व्यक्त केले. धर्मापुरी येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठान संचालित सर्व शाखांच्या शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये आयोजित विविध परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या १८४ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा रविवारी, २९ जून रोजी उत्साहात झाला. त्यावेळी उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करतांना श्री.चिवटे बोलत होते.

अध्यक्षस्थानी राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक शिवसांभ सोनटक्के होते. निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, डायटचे प्राचार्य डॉ. विकास सलगर, शिक्षणाधिकारी सविता बिरगे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के, सचिव शीतल सोनटक्के, किरण कोरे आदींसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी आयआयटी प्रवेशपात्र प्रेम वानखेडे, शुभम बोराडे आणि शंतनू थोरात, नीट परीक्षेतील नकुल पौळ, अंकिता डोळसे, सार्थक बोबडे, संस्कृती चाफे, सीईटी परीक्षेतील स्नेहा कदम, दिपाली रसाळ, आकांक्षा त्रिभुवन, उत्कर्षा ढोरे, गायत्री बिलवरे तसेच दहावी, बारावी, शिष्यवृत्ती, एनएमएनएस शिष्यवृत्तीपात्र आदी एकूण १८४ गुणवंतांचा पालकांसह सत्कार करण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील बदलांनुसार ज्ञानसाधनामध्ये शिक्षण दिले जाते. आज विविध क्षेत्रांत संस्थेचे विद्यार्थी कार्यकर्तृत्व सिद्ध करीत आहेत, असे प्रा.सोनटक्के यांनी नमूद केसे. श्री.कोरे,डॉ.सलगर आणि मान्यवरांनी ज्ञानसाधनाच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाबद्दल गौरोद्गार काढले.

प्रास्ताविक प्राचार्य शीतल सोनटक्के यांनी केले. सूत्रसंचालन दिलीप शृंगारपुतळे, पंढरीनाथ कदम आणि स्वाती धुळे यांनी केले. रूख्मांगत चाफे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला मनीष बाजड, बालाजी मोरे, केशव दुधाटे मदन लांडगे, गणेश धुमाळे, अशोक धुळे, गयाताई भालेराव, मनीषा उमरीकर, मंगला कुलकर्णी आदींसह पालक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!