महाराष्ट्र विधानमंडळ : पावसाळी अधिवेशन सुरू
मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाच्या सन २०२५ मधील पावसाळी अधिवेशनास आज प्रारंभ झाला. अधिवेशनासाठी विधानभवन येथे आगमन करताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी मंत्रिमंडळातील सदस्य गण तसेच विधिमंडळातील सदस्यांची उपस्थिती होती. त्यानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांची सदिच्छा भेट घेत त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.