मनमाड-परभणी रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण करा
रेल्वे बोर्डाचे सदस्य डॉ.शिवाजी शिंदे यांची मागणी
सेलू : मध्य रेल्वे बोर्डाच्या प्रयागराज येथे झालेल्या बैठकीत सेलू येथील डॉ. शिवाजी शिंदे यांनी मनमाड ते परभणी रेल्वे दुहेरीकरणाला गती देण्यासाठी अधिक निधी उपलब्ध करून हे काम दोन वर्षात पूर्ण करण्याची मागणी केली. उत्तर मध्य रेल्वे बोर्ड सदस्यपदी सेलू येथील डॉ. शिवाजी शिंदे यांची निवड झाल्यानंतर ते पहिल्यांदाच प्रयागराज येथे २५ जूनला बैठकीस उपस्थित होते. जेष्ठ नागरिकांना तिकिटात ५० टक्के सवलत, अमृत योजनेंतर्गत रेल्वे स्टेशनचा विकास, सेलू येथे पूर्वीप्रमाणे गाड्यांना थांबा देणे, विशाखापट्टणम व नगरसोल गाड्यांना थांबा देण्याबाबत मुद्दे त्यांनी मांडले. रेल्वे बोर्ड प्रमुख जोशी यांनी या मागण्यांबाबत सकारात्मकता दर्शविल्याचे शिंदे यांनी सांगितले.