शेतीत ‘एकाचे हजार दाणे’ करण्याची क्षमता : दगडोबा माघाडे
सेलू : शेतीत ‘एकाचे हजार दाणे’ करण्याची क्षमता आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीकडे वळले पाहिजे, असे प्रतिपादन दगडोबा माघाडे यांनी केले. हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त, कृषी दिनानिमित्त (मंगळवार, दि. १) बोर्डीकर कृषी महाविद्यालय, सेलू यांच्यावतीने केमापूर येथे आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
माघाडे पुढे म्हणाले की, “शेतीत काय पिकते, यापेक्षा काय विकते याचा विचार करून आपल्या शेतमालाची योग्य जाहिरात केली, तर शेतीला चांगले दिवस यायला वेळ लागणार नाही.”कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ. शरद ठाकर होते. यावेळी शेतकरी मित्र मनोहर गुठ्ठे, प्रकाश आंधळे, वामन गुठ्ठे, नामदेव आंधळे यांची उपस्थिती होती.
ग्रामीण कृषी कार्यानुभव आणि कृषी औद्योगिक संलग्न उपक्रमांतर्गत सहभागी ग्रामीण मूल्यांकन (पी.आर.ए) गावात रांगोळी काढून व प्रभात फेरी काढून शेतकऱ्यांची जनजागृती करण्यात आली. या उपक्रमास प्राचार्या डॉ. ए.ए. चव्हाण, कार्यक्रम समन्वयक डॉ. एन.एन. चव्हाण आणि कार्यक्रम अधिकारी डॉ. यु.वाय. पुराणिक यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरव तौर यांनी केले, तर प्रास्ताविक प्रभावती घुगे यांनी केले. नारायण आष्टकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमास गावातील शेतकरी आणि कृषी महाविद्यालयातील कृषीदूत मोठ्या संख्येने उपस्थित हो