आषाढी एकादशी : पवन आडळकर मित्रमंडळाकडून फराळ वाटप
सेलू: आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर सेलू येथील क्रांती चौकात माजी नगराध्यक्ष पवन आडळकर आणि त्यांच्या मित्र परिवारातर्फे शालेय वारकरी विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले.यावेळी सेलू शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशभूषेत, विविध देखावे सादर करत दिंडीची शोभा वाढवत होते. उपस्थित मान्यवरांनी सर्व दिंड्यांचे स्वागत केले.
या कार्यक्रमाला काँग्रेस पक्षाचे सेलू तालुका अध्यक्ष तसेच साईबाबा बँकेचे अध्यक्ष हेमंतदादा आडळकर, माजी नगराध्यक्ष पवनराजे आडळकर यांच्यासह मित्र परिवारातील सदस्य आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनोद तरटे, संदीप आडळकर, आकाश अस्वले, सचिन राऊत, नृसिह हरणे, मुशताक भाई, ओम तोशनिवाल, शेख दिलावर, राहुल सूर्यवंशी, गजानन शिंदे, अविनाश आडळकर यांनी विशेष परिश्रम घेतले.