कान्हेकर शारदा विद्यालयाला एक लाखाचे शैक्षणिक साहित्य

कान्हेकर शारदा विद्यालयाला एक लाखाचे शैक्षणिक साहित्य

मंडळ अधिकारी मुकुंद आष्टीकर कुटुंबियाचा पुढाकार

सेलू : सेलू येथील कै.सौ.राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालयात शनिवारी, ५ जुलै रोजी कै.किशनराव आणि कै. सौ. राधाबाई कान्हेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विद्यार्थी गुणगौरव समारंभ झाला. यावेळी मंडळ अधिकारी मुकुंद आष्टीकर यांनी शाळेच्या ग्रंथालय, क्रीडा आणि विज्ञान साहित्यासाठी एक लाख रुपये मदतीची देणगी जाहीर केली.

अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष रामनाना पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, मंडळ अधिकारी मुकुंद आष्टीकर, रामराव लाडाणे, चंद्रप्रकाश सांगतानी, जयप्रकाश बिहाणी, मुंजाभाऊ भिसे, सुनील डख आदींची प्रमुख उपस्थिती होती. महेश भांगडीया, सुदर्शन अच्छा, रोहित आकात यांनी ध्वनी व्यवस्था साहित्य संच व आसनपट्ट्या भेट दिल्या.

कृतज्ञता, सेवा, संवेदनशीलता, कर्तव्य आणि परोपकार हे साने गुरुजींनी दिलेले संस्कार यशस्वी जीवनाचे मूलाधार प्रत्येक विद्यार्थ्याने आत्मसात करावेत, असे प्राचार्य कुलकर्णी यांनी नमूद केले. संस्थेचे उपाध्यक्ष श्रीबल्लभ लोया यांनी मातोश्री पुष्पाबाई यांच्या स्मरणार्थ इयत्ता १० वी परीक्षेत शाळेतून प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन हजार पाचशे रुपये पारितोषिक, तर १ ली ते ९ वीतील गुणवंतांचा कान्हेकर परिवाराच्या वतीने शालेय साहित्य, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. माजी विद्यार्थी योगेश सोळंके यांचा सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक मुख्याध्यापक डी.डी.शिंदे यांनी केले, सूत्रसंचालन सुभाष मोहकरे, ए.जी. पाईकराव यांनी केले तर एस.एम. जुमडे यांनी आभार मानले. चंद्रशेखर नावाडे, प्रल्हादराव कान्हेकर, एकनाथराव पौळ, केशव डिग्रसकर, हरिहर पाठक, प्रा.नागेश कान्हेकर, राम कान्हेकर, बी. आर. साखरे आदींची उपस्थिती होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!