विवेकानंद विद्यालया च्या ६ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
सेलू : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये भा.शि.प्र. संस्था, अंबाजोगाई संचालित सेलू येथील विवेकानंद विद्यालयाचे सहा विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविले असून शिष्यवृत्ती धारक ठरले आहेत. पाचवी इयत्तेतून आदित्य गिरी (जिल्ह्यात ५१ वा), अनन्या कोल्हे (८५ वी), आणि आरुष ताठे (८७ वा), तर आठवी इयत्तेतून रुद्र गुंगाणे (जिल्ह्यात ४३ वा), दीपक काष्टे ( ८० वा), आणि युवराज कुमार (८७ वा) यांनी शिष्यवृत्ती मिळवली आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांना रागिणी जकाते, विजय चौधरी, विनोद मंडलिक, शंकर राऊत, काशिनाथ पांचाळ, अनिकेत भिलेगावकर, चंदू कव्हळे, आणि सोनाली जोशी यांनी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल स्थानिक व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष हरिभाऊ चौधरी, स्थानिक कार्यवाह उपेंद्र बेल्लूरकर, शालेय समिती अध्यक्षा करुणा कुलकर्णी, मुख्याध्यापक शंकर शितोळे आणि अनिल कौसडीकर यांनी अभिनंदन केले आहे.