ग्राहकांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करा : अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांचे निर्देश 

ग्राहकांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करा : अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांचे निर्देश 

परभणी : परभणीत जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी सर्व विभागप्रमुखांना ग्राहकांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करण्याचे निर्देश दिले. या बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे, ग्राहक पंचायतचे प्रांताध्यक्ष डॉ. विलास मोरे, प्रादेशिक परिवहन अधिकारी आ.अ. पाराशर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण, आरोग्य अधिकारी डॉ. रेवती महाजन, वजनमापे विभागाचे उपनियंत्रक ग.भा. कांबळे, महावितरण विभागाचे एस.एस. कुरेशी, अन्न औषध प्रशासनाचे अनिकेत भिसे यांच्यासह जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य उपस्थित होते. डॉ. काळे यांनी परिषदेला प्राप्त तक्रारींवर केलेल्या कारवाईचा आढावा घेतला. सध्या शेतीसाठी बियाणे आणि शेतउपयोगी साहित्य खरेदीचा काळ असल्याने शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले. बोगस बियाणे विक्री झाल्यास शेतकऱ्यांस नुकसान भरपाई देण्याचे आणि बोगस बियाणे तयार करणाऱ्या कंपन्यांविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवण्याचे निर्देश दिले. तसेच, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ग्राहकांच्या तक्रारी त्वरित सोडवाव्यात अशा सूचनाही त्यांनी दिल्या. मागील बैठकीतील सातपैकी पाच तक्रारी निकाली काढण्यात आल्या असून, तक्रारदारांनी ग्राहक परिषदेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!