सेलू तालुक्यात ‘महिलाराज’: ४१ ग्रामपंचायतींमध्ये होणार महिला सरपंच
सेलू जि.परभणी : सेलू तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी २०२५ ते २०३० या कालावधीसाठी सोमवारी (दि.१४) आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीत तब्बल ४१ गावांमध्ये महिलांसाठी सरपंचपद राखीव झाल्याने, तालुक्यातील निम्म्याहून अधिक ग्रामपंचायतींचा कारभार आता महिलांच्या हाती येणार आहे.
तहसील कार्यालयाच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी संगीता सानप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तहसीलदार डॉ. शिवाजी मगर यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता ही सोडत प्रक्रिया पार पडली. विशेष म्हणजे, इयत्ता चौथीतील सिद्धी लक्ष्मण तायवाडे या विद्यार्थिनीच्या हस्ते चिठ्ठी काढून सरपंचपदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले.
यावेळी तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, आजी-माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरक्षणाचे सविस्तर विवरण याप्रमाणे :
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिलांसाठी राखीव): लाडनांद्रा, पिंपरी बु., सिंगठाळा (ग्रुप ग्रामपंचायत), राजवाडी, गोहेगाव, पिंपरी बु., गव्हा, नागठाणा-कुंभारी (ग्रुप ग्रामपंचायत), खेर्डा (दु.की.), म्हाळसापूर, कुपटा, कवडधन. (एकूण ११ गावे)
* नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण):
कुंडी, तळतुंबा, राजा, सावंगी (पि.सी.), पारडी कौसडी-मापा (ग्रुप ग्रामपंचायत), कन्हेरवाडी, आडगाव (दराडे), रवळगाव, ब्रम्हवाकडी, राजुरा, खवणे (पिंपरी).
* सर्वसाधारण प्रवर्ग (महिलांसाठी राखीव):
निरवाडी बु., मोरेगाव, वालूर, हातनूर, खादगाव, चिकलठाणा खु., साळेगाव, धनेगाव, निरवाडी खु., खुपसा, गोमेवाकडी, शेलवाडी, आहेर बोरगाव, करडगाव, रायपूर, सोन्ना, झोडगाव, डिग्रस खु.-डिग्रस बु. (ग्रुप ग्रामपंचायत), करजखेडा, सिद्धनाथ बोरगाव, सोनवटी, गुगळी धामणगाव, मालेटाकळी, बोरकिनी-नरसापूर (ग्रुप ग्रामपंचायत), डासाळा. (एकूण २५ गावे)
* सर्वसाधारण प्रवर्ग (सर्वसाधारण):
हिस्सी, ढेंगळी पिंपळगाव, पिंपरी खु., सिमनगाव, राधेधामणगाव, ब्राम्हणगाव प्र.प., जवळा जिवाजी, कान्हड, गिरगाव बु., चिकलठाणा बु., तिडीपिंपळगाव, बोरगाव जहांगीर-वलंगवाडी (ग्रुप ग्रामपंचायत), वाकी, वाई-बोथ (ग्रामपंचायत), खैरी, गिरगाव खु., निपाणी टाकळी, पिंपळगाव गोसावी, हट्टा, काजळी रोहीणा, कुडा, केमापूर, नांदगाव, पिंप्रोळा.
* अनुसूचित जाती (महिलांसाठी राखीव):
भांगापूर, ब्राम्हणगाव प्र.को.-डुघरा (ग्रुप ग्रामपंचायत), डिग्रस जहांगीर, शिंदे टाकळी, तांदुळवाडी.
* अनुसूचित जाती (सर्वसाधारण):
हादगाव खु., राव्हा, देऊळगाव गात, शिराळा, देवगाव. (एकूण १० गावे)
* अनुसूचित जमाती:
गुळखंड येथील सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाले आहे. या सोडत प्रक्रियेवेळी उपविभागीय अधिकारी संगीता सानप, तहसीलदार डॉ. शिवाजी मगर यांच्यासह नायब तहसीलदार गजानन इनामदार, हरीश टाक, जी. आर. राठोड, विजय टेकाळे आणि अमोल खेडकर उपस्थित होते.