ज्ञानसाधनामध्ये प्रा.किरण सोनटक्के यांची ग्रंथतुला

ज्ञानसाधनामध्ये प्रा.किरण सोनटक्के यांची ग्रंथतुला

गुरुगौरव कृतज्ञता सोहळा उत्साहात

परभणी : ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने आयोजित “गुरुगौरव कृतज्ञता सोहळा” हा विशेष कार्यक्रम १३ जुलै रोजी उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत साईनाथ महाराज होते. प्रमुख अतिथी म्हणून जनार्धन महाराज खडकवाडीकर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमात ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के यांची कथा, कादंबरी, धार्मिक ग्रंथ, शैक्षणिक ग्रंथांनी तुला करून त्यांच्या कार्याचा गौरव करत कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षकांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्हाने सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक श्री.भुरे यांनी केले. सूत्रसंचालन पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांच्या नियोजन समितीने पुढाकार घेतला.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!