१६ जुलैपासून ‘जागर श्यामच्या कथांचा’
हेलस येथील साने गुरुजी कथामालेचा उपक्रम, सहभागी होण्याचे आवाहन
जालना : अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, शाखा हेलस, ता. मंठा, जि. जालना या संस्थेने तीन दशके पूर्ण करून ३१ व्या वर्षात पदार्पण केले आहे. या निमित्ताने शिक्षणासोबतच सुसंस्कार आणि मनोरंजन व्हावे, या उदात्त हेतूने पूज्य साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकातील ४२ कथांचा समावेश असलेला ‘जागर श्यामच्या कथांचा’ हा उपक्रम या वर्षी १६ जुलै, बुधवारपासून सुरू होत आहे.
या कथांची उत्कृष्ट अभिवाचन निर्मिती छत्रपती संभाजीनगर येथील श्री. राजेंद्र जोशी यांनी केली असून, उपविभागीय अधिकारी अंजली धानोरकर यांनी आपल्या गोड वाणीतून या कथांचे अभिवाचन केले आहे. या कथा प्रत्येक मुलांपर्यंत शैक्षणिक ग्रुपच्या माध्यमातून पोहोचवण्यासाठी शिक्षक, पालक आणि कथामालेचे कार्यकर्ते यांचे नेहमीच मोलाचे सहकार्य लाभले आहे. त्यामुळे या उपक्रमाला यापूर्वीही मोठा प्रतिसाद मिळाला होता आणि विविध शाळांमधील हजारो विद्यार्थी यात सहभागी झाले होते. त्यांना ऑनलाईन प्रमाणपत्रेही देण्यात आली होती. या वर्षीही सर्वांनी सहकार्य करावे आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन संयोजक तथा अध्यक्ष कल्पना दत्तात्रय हेलसकर (९४२००३६९३५) आणि संयोजन समितीने केले आहे.
उपक्रम असा असेल…
* दररोज एक कथा याप्रमाणे ४२ दिवस ४२ कथा शिक्षकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये पाठवण्यात येतील.
* कथा परिपाठामध्ये मुलांना ऐकवण्याची व्यवस्था करावी.
* शिवाय मुलांच्या वर्गाच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्येही कथा पाठवता येतील.
* ४२ कथा ऐकून झाल्यावर ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल.
* सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र ऑनलाईन मिळेल.
* सर्व सहभागी शाळांनाही ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात येईल.
उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन
अधिकाधिक विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी होण्यासाठी शिक्षकांनी खालील व्हॉट्सॲप कम्युनिटीमध्ये सामील व्हावे किंवा लिंक पुढे फॉरवर्ड करून सहकार्य करावे : https://chat.whatsapp.com/CFRkLFQIysH0TuoSyUEBNq असे आवाहनदेखील करण्यात आले आहे. संयोजन समितीत डॉ. सुहास सदाव्रते – ९४०४५३६७६७, बाबासाहेब हेलसकर – ९८८१५२५५१०, विजय वायाळ – ७५८८०८९३६०, सतीश कुलकर्णी – ७५८८४१२८५२, प्रमोद देशमुख – ९८९०८०६४००, मंताजी ढाकरे – ८४१२८०३५९५, आर.आर. जोशी – ९४२१४७४३४०, जमीर शेख – ९४२१३२७०६२ आदींचा समावेश आहे.
शाळांनी खालील लिंकद्वारे नोंदणी करावी