सेलूतील नूतन शिक्षण संस्थेचे ५९ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक 

सेलूतील नूतन शिक्षण संस्थेचे ५९ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक 

विविध शिष्यवृत्ती परीक्षेत दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांचे यश

सेलू : सेलू् येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या नूतन विद्यालय, श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशाला आणि बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूलच्या एकूण ५९ शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे द्वारा शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये आयोजित पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत संस्थेचे एकूण ८२ विद्यार्थी पात्र ठरले. त्यापैकी नूतन विद्यालयाचे १८, बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूलचे १७ आणि नूतन कन्या प्रशालेची एक अशा एकूण ३६, एनएमएनएस परीक्षेत एकूण ९, नौरोजी वाडिया महाविद्यालय पुणे द्वारा आयोजित आठवी ते दहावीच्या एमटीएस परीक्षेत एकूण १४ शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत‌.

विविध शिष्यवृत्ती परीक्षेत संस्थेच्या दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. नूतन विद्यालयातील शिष्यवृत्तीधारकांचा प्रमुख पाहुणे अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.अशोक नाईकनवरे यांच्या हस्ते नुकताच सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.सत्यनारायण लोया, उपाध्यक्ष डी.के.देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, शालेय समिती अध्यक्ष सीताराम मंत्री, नंदकिशोर बाहेती, दत्तराव पावडे, मकरंद दिग्रसकर, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, राजेश गुप्ता, मुख्याध्यापक संतोष पाटील, एन.डी.पाटील, एन.पी.पाटील, किरण देशपांडे, पी.टी.कपाटे आदींनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!