साईबाबा नागरी सहकारी बँकेतर्फे माजी आमदार दुर्राणी यांचा सत्कार
पाथरी : पाथरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या ६८ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार करण्यात आला. यावेळी साईबाबा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर, उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर, संचालक प्रतापशेठ कांचन, शेख इम्रान, मुश्ताक रब्बानी, व्यापारी एकनाथ पौळ, आणि व्यवस्थापक निसार पठाण हे उपस्थित होते.
बाबाजानी दुर्राणी यांच्या वाढदिवसानिमित्त पाथरीत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांनी त्यांना शुभेच्छा देऊन आपले प्रेम व्यक्त केले.