सेलू, जिंतूरमध्ये अतिवृष्टी; मानवत, पाथरीत मुसळधार

सेलू, जिंतूरमध्ये अतिवृष्टी; मानवत, पाथरीत मुसळधार

करपरा, कसुरासह नदीनाले ओढ्यांना पूर, पिकांना जीवदान

परभणी : मागील काही दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने परभणी जिल्ह्यातील विविध भागात बुधवारी, १६ जुलै रोजी रात्री जोरदार हजेरी लावली. जिंल्ह्यातील सेलू, जिंतूर व वाघी धानोरा महसूल मंडळात अतिवृष्टी झाली, तर पेडगाव, जांब, कासापुरी, पाथरी, देऊळगाव, चिकलठाणा, मानवत मंडळात मुसळधार पाऊस झाला आहे. परभणी तालुक्यात मध्यम ते चांगला पाऊस झाला. मात्र पूर्णा, पालम, गंगाखेड तालुक्याकडे पावसाने पाठ फिरविल्याचे दिसून आले. दरम्यान, बुधवारी रात्रीच्या पावसामुळे करपरा, कसुरा नद्यांसह लहानमोठे नदीनाले ओढ्यांना पूर आला. नदीकाठावरील शेतजमीनीत मोठ्याप्रमाणावर पाणी घुसले आहे. पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून खरिप पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. परभणी तालुक्यातील पेडगाव ७८.३ मिलीमीटर, जांब ६८.८, झरी ४०.५, टाकळी कुंभकर्ण ३०.३,  पाथरी तालुक्यात पाथरी ९४, बाभळगाव २७.८, कासापुरी ८८.५, जिंतूर तालुक्यात जिंतूर १३७, बामणी २९.३, बोरी २७.८, आडगाव २९.३, चारठाणा ४४.४, वाघी धानोरा १६५.३, दुधगाव ४०.५, सेलू तालुक्यात सेलू ११४.३, देऊळगाव ८४.३, वालूर २८.३, कुपटा ४७.३, चिकलठाणा ८२.३, मोरेगाव ६९., सोनपेठ तालुक्यात सोनपेठ ४१.५, मानवत तालुक्यात मानवत ९४, केकरजवळा २७.८ कोल्हा ५५.८, ताडबोरगाव ५५.८ मिलीमीटर पाऊस झाला आहे.  पूर्णा, पालम, गंगाखेड वगळता अन्य मंडळात समाधानकारक पाऊस झाला. गुरूवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी परभणी ३४.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

पिकांना जीवदान

मागील दहा बारा दिवसांपासून पावसाने चांगलीच दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत होते. परंतु बुधवारी रात्री जिल्ह्यातील विविध महसूल मंडळात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. पूर्णा, पालम परिसरात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. तालुकानिहाय झालेला सरासरी पाऊस मिलिमीटरमध्ये : परभणी २७.९, गंगाखेड ९.८, पाथरी ७०.१, जिंतूर ६१.५, पूर्णा २.१, पालम ३.७ सेलू ७१, सोनपेठ १४.८, मानवत ४७.५

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!