ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी

ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी

युथ मूव्हमेंटचे पालकमंत्री बोर्डीकर यांना निवेदन

सेलू : युथ मूव्हमेंट ऑफ महाराष्ट्र, सेलू युनिटने “ऑनलाइन जुआ हटाओ – देश का युवा बचाओ” या अभियानांतर्गत ०१ ते १४ जुलै या कालावधीत एक मोहीम राबवली. या मोहिमेअंतर्गत, त्यांनी आमदार तथा राज्यमंत्री आणि परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, ऑनलाइन जुगाराच्या दुष्परिणामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात किंवा आगामी हिवाळी अधिवेशनात ऑनलाइन जुगाराविरोधात कायदा तयार करण्यासाठी आवाज उठवावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. मंत्री बोर्डीकर यांनी या अभियानाचे मनापासून कौतुक केले आणि या गंभीर विषयावर कायदा करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले. या वेळी युथ मूव्हमेंट ऑफ महाराष्ट्रचे सदस्य शेख इम्रान, तसेच सेलू शहराध्यक्ष नोमान सकलैन, शोएब हाशमी, बिलाल हरमैन, शेख इस्माईल, अकरम मिर्झा, जुबैद हसनैन, सय्यद साजिद, शेख साजीद, शेख मुखिद यांच्यासह अनेक युवक उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!