डॉ.संजय रोडगे यांच्या व्याख्यानाला प्रतिसाद
सेलू येथील प्रिन्स इंग्लिश स्कूलचे आयोजन
सेलू : लाइफ सायन्स विषयाची गोडी निर्माण करण्यात आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणे या उद्देशाने सेलू येथील एल.के.आर.रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये श्रीराम प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांचे गुरूवारी, १७ जुलै रोजी नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान झाले. डॉ.रोडगे यांनी आपल्या व्याख्यानात फिजिओलॉजी, ॲनाटॉमी, पचनसंस्था आणि श्वसनसंस्था यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून मनमोकळा संवाद साधला.
सॅनरो ऑडिटोरियम हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी शिक्षक नारायण चौरे, बाजीराव मोगल, राजेंद्र देशमुख, नुफाइल, राहुल साऊ, संतोष पावडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते