अनुसूचित जातींसाठी क्रीडांगण आणि व्यायामशाळा विकास योजना : १४ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करा

अनुसूचित जातींसाठी क्रीडांगण आणि व्यायामशाळा विकास योजना : १४ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करा

परभणी : परभणी जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या (SC) घटकांसाठी क्रीडांगण विकास अनुदान योजना आणि व्यायामशाळा विकास अनुदान योजना राबविण्यात येत आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र शासन, पुणे यांच्या निर्देशानुसार, तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी आणि समाज कल्याण कार्यालयाच्या संयुक्त सहकार्याने या योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी १४ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

योजनेचा उद्देश

नागरिकांमध्ये नियमित व्यायाम आणि फिटनेसची सवय लावणे, लठ्ठपणा कमी करणे आणि संतुलित जीवनशैलीला प्रोत्साहन देणे हा या योजनांचा मुख्य उद्देश आहे. निरोगी राष्ट्रनिर्मितीसाठी क्रीडा आणि शारीरिक व्यायामाचा प्रसार करणे, तसेच विशेषतः अनुसूचित जातीतील दुर्बळ घटकांना प्राधान्य देणे हे यामागील प्रमुख ध्येय आहे.

कोण अर्ज करू शकते?

या योजनांसाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा, महानगरपालिका, नगरपालिका, नगर पंचायत, तसेच शासकीय व निमशासकीय संस्था पात्र आहेत. तथापि, अर्ज करणाऱ्या संस्था पाच वर्षांपूर्वी १००% शासकीय अनुदानित असणे अनिवार्य आहे.

अनुसूचित जातीतील संस्था, शाळा, पंचायत संस्था आणि इतर पात्र घटकांना या दोन्ही योजनांचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आणि निश्चित मुदतीपूर्वी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी येथे प्रस्ताव सादर करावेत अधिक माहितीसाठी क्रीडांगण विकास योजना: सुयश नाटकर – ९७६३९९४८४६, व्यायामशाळा विकास योजना: रोहन औंढेकर – ८९९९३३७९२९ यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे यांनी केले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!