सेलूत श्रावणमासी श्रीमद् ज्ञानेश्वरी प्रवचनमालेला सुरूवात

सेलूत श्रावणमासी श्रीमद् ज्ञानेश्वरी प्रवचनमालेला सुरूवात

सेलूत श्रावणमासी श्रीमद् ज्ञानेश्वरी प्रवचनमालेला सुरूवात

सेलू : शिर्डीचे संत श्री साईबाबांचे सद्गुरू आणि शहराचे ग्रामदैवत श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान व श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान यांच्या वतीने श्रावणमासानिमित्त महिनाभर आयोजित श्रीमद् ज्ञानेश्वरी प्रवचन सेवेला पुरुषोत्तम महाराज वालूरकर यांच्या प्रवचनसेवेने शुक्रवार, २५ जुलैपासून सुरुवात झाली आहे. २३ ऑगस्टपर्यंत आध्यात्मिक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती आपली सेवा रुजू करणार आहेत.

प्रवचनसेवेचे हे २१ वे वर्ष आहे. या वर्षी २५ जुलै ते २३ ऑगस्ट या कालावधीत दररोज रात्री ते या वेळेत ही प्रवचन सेवा होणार आहे. दरम्यान, १७ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट या कालावधीत सकाळी ते १० या वेळेत श्री ज्ञानेश्वरी पारायण आयोजित करण्यात आलेले आहे. २३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता शंतनू महाराज पाठक (वालूर) यांचे काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविक भक्तांनी या प्रवचन सेवेत तसेच ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात सहभाग घेऊन श्रवणाचा तसेच प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


ज्ञान आणि भक्तीचा २१ वर्षांचा अखंड प्रवास

श्रावणमासानिमित्त आयोजित श्री ज्ञानेश्वरी प्रवचन व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे हे २१ वे वर्ष आहे. कोविड काळातदेखील आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून ही प्रवचन सेवा अखंडपणे चालवली गेली आहे. प्रवचन सेवेत श्री ज्ञानेश्वरीवरील गाढे अभ्यासक असलेल्या नामवंत व्यक्तींनी सेवा दिली आहे. या प्रवचन सेवेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रवचनासाठी निमंत्रित सेवेकरी कसल्याही प्रकारचे मानधन न घेता नियमित सेवा देत आहेत. याशिवाय वेळेची शिस्त पाळली जाते. अभ्यासू श्रोते व आयोजनातील साधेपणा आयोजकांकडून आजही जपला गेला आहे. श्रोत्यांसाठी ही प्रवचनमाला सेवा म्हणजे एक आध्यात्मिक पर्वणीच ठरत आली आहे.


अध्यात्मिक क्षेत्रातील नामवंतांकडून प्रवचन सेवा

  • २५ जुलै – पुरुषोत्तम महाराज वालूरकर
  • २६ जुलै – भगवान महाराज गजमल, डासाळकर
  • २७ जुलै – शिवाजी महाराज खवणे
  • २८ जुलै – विष्णुदास नामदेव महाराज ढवळे, चारठाणा
  • २९ जुलै – लक्ष्मीप्रसाद शंकरराव पटवारी, माजलगाव
  • ३० जुलै – भगवान महाराज सेलूकर
  • ३१ जुलै – शरदराव डोलारकर, परतूर
  • ०१ ऑगस्ट – मोहन महाराज हातकडके, सेलू
  • ०२ ऑगस्ट – तेजस सुधीर कुलकर्णी, पुणे
  • ०३ ऑगस्ट – प्रजापिता ब्रह्माकुमारीज
  • ०४ ऑगस्ट – अंबादासराव पावडे, हादगाव
  • ०५ ऑगस्ट – अर्जुन महाराज होलिया, सेलू
  • ०६ ऑगस्ट – महादेव महाराज ईरळदकर, ईरळद
  • ०७ ऑगस्ट – अशोक महाराज आकात, सेलू
  • ०८ ऑगस्ट – चंद्रकांत महाराज सातोनकर, सातोना
  • ०९ ऑगस्ट – प्रा. डॉ. श्रीहरी रंगनाथ महाराज पितळे, मेहकर
  • १० ऑगस्ट – रमेश महाराज मोरे, देवगावफाटा
  • ११ ऑगस्ट – अनंत महाराज पावडे, हादगाव
  • १२ ऑगस्ट – शंकर माधवराव आजेगावकर
  • १३ ऑगस्ट – प्रभाकरराव नित्रुडकर, परभणी
  • १४ ऑगस्ट – बालासाहेब महाराज आवटे, म्हाळसापूर
  • १५ ऑगस्ट – (माऊली जन्मोत्सव) संजय महाराज पिंपळगावकर
  • १६ ऑगस्ट – प्रणव जनार्दनराव पटवारी, माजलगाव
  • १७ ऑगस्ट – सुनील महाराज आष्टीकर
  • १८ ऑगस्ट – जयंतराव महाराज धानोरकर (छत्रपती संभाजीनगर)
  • १९ ऑगस्ट – श्री स्वामी शिवेंद्र चैतन्य महाराज, यशवाडी
  • २० ऑगस्ट – वैभव महाराज जगताप, पांडेपोखरी
  • २१ ऑगस्ट – अमोल महाराज बोधले, डिकसळकर
  • २२ ऑगस्ट – विठ्ठल महाराज सायखेडकर
  • २३ ऑगस्ट – सौ. सुजाताताई भंडारे, परभणी

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!