प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये पालक-शिक्षक सभा उत्साहात

प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये पालक-शिक्षक सभा उत्साहात

सेलू : प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये शनिवार, २६ जुलै २०२५ रोजी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ ची पहिली पालक-शिक्षक सभा उत्साहात पार पडली. श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांनी सभेचे अध्यक्षस्थान भूषवले.

डॉ. रोडगे यांनी नवीन शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत लागू केलेल्या कौशल्याधारित अभ्यासक्रमावर भर दिला. यासाठी शाळेत कम्पोझिट स्किल लॅब स्थापन केल्याचे त्यांनी सांगितले, ज्यामुळे विद्यार्थ्यांना व्यावहारिक कौशल्ये शिकता येतील. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्ड आणि आनंददायी शनिवार उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली. तसेच, ६ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन क्लासेस सुरू करण्यात आले आहेत.

डॉ. रोडगे यांनी जाहीर केले की, लवकरच शाळेच्या परिसरात राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग आणि नेहरू सायन्स सेंटर, मुंबई यांच्या सहकार्याने नवीन विज्ञान केंद्र उभारले जाईल. अपूर्वा पॉलीटेक्निकचे प्राचार्य प्रा. अशोक बोडखे यांनी स्किल लॅब आणि व्यावहारिक कौशल्यांबाबत सविस्तर माहिती दिली. शाळेच्या वार्षिक नियोजनाची आणि विविध उपक्रमांची माहितीही पालकांना देण्यात आली.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!