साईबाबा बँकेची ३० वी वार्षिक सभा उत्साहात

साईबाबा बँकेची ३० वी वार्षिक सभा उत्साहात

१ कोटी ९२ लाखांचा निव्वळ नफा ; सभासदांना १० टक्के लाभांश मंजूर

सेलू : साईबाबा नागरी सहकारी बँकेची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, २६ जुलै रोजी स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयात सकाळी ११ वाजता उत्साहात पार झाली. या सभेला मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.

अध्यक्षस्थानी बँकेचे संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आडळकर होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर, राम नाना खराबे, माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, डी.व्ही.मुळे, मधुकरनाना पौळ, एकनाथ पौळ, हाजी शफिख आलिखान, पुंजाराम निर्वळ; तसेच संचालक  कन्हैयालाल बालचंदानी, प्रवीणचंद बिनायके, ओम तोष्णीवाल, शेख इम्रान, गंगाधर आडळकर, प्रताप कांचन, सुरेंद्र माणियार, तजज्ञ संचालक संजय मगर, भाऊसाहेब मोगल आणि ए.टी. गजमल उपस्थित होते. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाणे यांनी प्रास्ताविक केले. अहवाल वाचन सुभाष चव्हाण यांनी केले. यावेळी ॲड.गोविंद शेळके, एकनाथ पौळ, मधुकर नाना पौळ, हाजी शफिख अली खान, तांगडे महाराज आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.

बँकेने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये १ कोटी ९२ लाख ९० हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. या नफ्यातून कायदेशीर तरतुदी वजा जाता, संचालक मंडळाने सुचवलेला १० टक्के लाभांश सभेने मंजूर केला. मागील आर्थिक वर्षात बँकेला ‘अ’ वर्ग प्राप्त झाला आहे. मार्च २०२५ अखेर सर्व कर आणि तरतुदी वजा जाता १ कोटी ९२ लाख ९० हजार रुपये नफा झाला आहे, अशी माहिती अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांनी दिली.

संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेचे वसूल भागभांडवल ६ कोटी ७२ लाख रुपये आहे, तर स्वनिधी २६ कोटी रुपये आहे. मार्च अखेर एकूण ठेवी २३६ कोटी ५२ लाख आहेत आणि कर्ज वाटप १२७ कोटी रुपये आहे. बँकेचा नेट एनपीए शून्य टक्के असून, ग्रॉस एनपीए ५.५३ टक्के आहे. बँकेचे एकूण सभासद ९४५४ आहेत. सर्व शाखा नफ्यात असून, गेल्या दहा वर्षांपासून १० टक्के लाभांश वाटप करत आहे, असे रामराव लाडाणे यांनी सांगितले.

सभेची सुरुवात साईबाबांच्या मूर्ती पूजनाने झाली. याप्रसंगी भरीव सामाजिक कार्य करणारे हाजी शफिख आलिखान आणि पुंजाराम निर्वळ टेलर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी केले, तर लिपिक पूजा काला यांनी आभार मानले. सभेच्या यशस्वीतेसाठी व्यवस्थापक दत्ता पौळ, संतोष हुगे, पठाण निसार, अविनाश आडळकर, शेख अबूजर, गुलाब सोनवणे, सुरेश आठे, आनंद मोरे, गव्हाने कैलास, विटेकर किशोर, आडळकर भास्कर, आडळकर नितीन, उमेश खरावणे, अजय मरळी, संतोष जायभाय, पारखे गोकुळ आणि सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

बॅंकेचा विविध पुरस्कारांनी गौरव

बँकेला आतापर्यंत १२ वेळेस ‘बँको’ पुरस्कार, १ ‘महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह असोसिएशनचा पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक’ पुरस्कार, १ ‘बेस्ट चेअरमन’ पुरस्कार, १ ‘बेस्ट डायरेक्टर’ पुरस्कार आणि १ ‘बेस्ट सीईओ’ पुरस्कार मिळाले आहेत. संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांनी ग्राहक व सभासदांना जास्तीत जास्त एटीएम पीओएस, ई-कॉम, मोबाईल बँकिंग, क्यूआर कोड अशा आधुनिक तंत्रज्ञान व सुविधांचा वापर करण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!