सेलू शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी…

कार्यकर्ता मेळाव्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांचा निर्धार

परभणी : सेलू (जि.परभणी) शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी, पालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविणारच, असा निर्धार करून शहरासह ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन माजी आमदार विजय भांबळे यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा सोमवारी (सहा जून) झाला. त्यावेळी भांबळे बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार फौजिया खान होत्या. आमदार बाबाजानी  दुर्राणी, माजी खासदार सुरेश जाधव, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक काकडे, डॉ.संजय रोडगे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेक्षा भांबळे, निर्मला लिपणे, माऊली ताठे, विनायक पावडे, जमीरभाई पटेल, सारंगधर महाराज, अहमदअली खान , सुधाकर रोकडे, शिलाताई काकडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
दिल्ली सक्षम करण्यासाठी गल्ली सक्षम करावी लागेल. त्यासाठी  स्थानिक स्वराज्य संस्थां ताब्यात येणे आवश्यक आहे, असे फौजिया खान यांनी स्पष्ट केले. आमदार दुर्राणी, जाधव यांनी मार्गदर्शन केले. या वेळी उपस्थित मान्यवरांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या देवगावफाटा, रायपूर, देऊळगाव गात, मोरेगाव, पिंपरी, सोनवटी, खादगाव, राजा येथील कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन मोहन बोराडे यांनी केले. नामदेवअप्पा डख, अशोक अंभोरे, अजय डासाळकर ,चंद्रकांत गाडेकर, रहीमखाँ पठाण, रघुनाथ बागल, पुरुषोत्तम पावडे, बालासाहेब रोडगे, मनीषा केंद्रे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, यानिमित्ताने सेलू शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. माजी आमदार भांबळे, अशोक काकडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

परभणी जिल्ह्याला धनंजय मुंडे यांच्यासारखे कर्तव्यदक्ष पालकमंत्री मिळाल्यापासून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या    तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याची लाट आली आहे. त्यामुळे आगामी काळात माजी आमदार विजय भांबळे, जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वाखाली सेलू पालिकेवर राष्ट्रवादीचाच झेंडा फडकवू, असा विश्वास अशोक काकडे यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!