परभणी : सेलू येथे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. पंच्याहत्तर जेष्ठ नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, शांतिदूत परिवार व डॉ.अशोकराव जोगदंड चॅरिटेबल ट्रस्टच्या पुढाकाराने मंगळवारी (सात जून) शिबिर घेण्यात आले. उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, नूतन शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. विनायकराव कोठेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी आरोग्य पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. शासकीय योजनेमध्ये निराधार महिलांना येणाऱ्या अडचणीबाबत संगेवार यांना निवेदन देण्यात आले. नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.सुनील सोनटक्के अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.कैलास आवटे, दंतरोग तज्ज्ञ डॉ.अनिकेत जोगदंड, डॉ.अनुराग जोगदंड, डॉ.लबडे यांनी आरोग्य तपासणी केली. संयोजक डी.व्ही.मुळे, रविंद्र पाठक, भगवान पावडे, सुनील राठोड, कटारे, धनवे, आनंद बाहेती, मंगेश शेळके, रत्नपारखी यांनी परिश्रम घेतले.