साईबाबा बँकेतर्फे हजयात्रेकरूंचा सत्कार

परभणी : सेलू येथील साईबाबा नागरी सहकारी बँकेतर्फे गुरुवारी नऊ जून रोजी हजयात्रेकरूंचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर, उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर, माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, संभाजी पवार, इम्तियाज अलीखान, मुश्ताक रब्बानी, इर्शाद, इरफानभाई यांची उपस्थिती होती. या वेळी शेख अतिख कुरेशी, उमर साहब कुरेशी, शेख मेहताबसर, मुजाहेद फारोखी, अक्रम पठाण याचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. दरवर्षी इस्लामी कालगणनेच्या जिल हिज्ज महिन्यात पवित्र हज यात्रा सौदी अरेबिया मधील मक्का मदिना येथे पार पडते. सूत्रसंचालन संतोष हुगे आभार रामराव लाडाणे यांनी मानले. कार्यक्रमासाठी निसार पठाण, शेख अबुजर, भास्कर आडळकर भास्कर, सुनील आडळकर, प्रीतेश जोशी गजानन झुटे, उमेश खरावणे, अजय मरळी यांनी परिश्रम घेतले.

***

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!