९० लाखांचा मुद्देमाल जप्त, १७ आरोपींविरुद्ध गुन्हा
परभणी : काजळी रोहिणा येथे अवैध रेती उत्खनन प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोकलॅन जेसीबी यंत्रासह एकूण 89 लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. १७ आरोपींविरुद्ध सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मंगळवारी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अविनाशकुमार व महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.काजळी रोहिणा दुधना नदीपात्रात पोकलेनद्वारे रेतीचे उत्खनन सुरु असताना पोलिसांनी छापा मारला. एका ट्रॅक्टरमध्ये रेती भरतांना दिसून आले. याप्रकरणी एकूण १७ आरोपीतांविरूध्द सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात पोक्लेन – एक , ट्रॅक्टर – तीन , टेम्पो – चार व रेती असा एकूण 89 लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक जयंत मीना व अप्पर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे.
***