अनिल रत्नपारखी : हिंदी मराठी ग्रंथालयात सानेगुरुजींना अभिवादन
सेलू : ‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे’, संदेश देणार्या पूज्य साने गुरुजींचे साहित्य संस्कारदायी आहे, असे मत कथामालेचे जेष्ठ कार्यकर्ते अनिल रत्नपारखी यांनी व्यक्त केले.
साने गुरुजी स्मृती दिनानिमित्त शनिवारी (११ जून) स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ग्रंथपाल महादेव आगजाळ, सहग्रंथपाल पंडित जगाडे ,राजेंद्रआप्पा महाजन, बाबासाहेब हेलसकर आदींची उपस्थिती होती. बालवाचक सान्वी हेलसकर व सुनील पौळ यांच्या हस्ते सानेगुरुजींच्या प्रतिमेचे पूजन केले. प्रास्ताविक विलास शिंदे, सुत्रसंचालन महादेव आगजाळ, तर आभार पंडित जगाडे यांनी मानले . कार्यक्रमासाठी पुरुषोत्तम कुलकर्णी, शेख ए.ए., अनिल टाके, सुयोग साळवे, गोविंद सोळंके, सुनील सोमाणी, सर्जेराव रोडगे आदींसह वाचक उपस्थित होते.
अनिल रत्नपारखी म्हणाले, ” मानवतावादी दृष्टीकोन ठेवून जीवन जगले पाहिजे. मानव धर्म खरा धर्म आहे. लहान मुले म्हणजे देवाघरची फुलं होत. या सानेगुरुजींच्या विचाराने लहान मुलावर संस्कार केले पाहिजेत .मोबाईलच्या मोहपाशात अडकलेल्या मुलांना संस्कारक्षम साहित्य वाचनासाठी उपलब्ध करून देणे त्यांना प्रेरित करणे आवश्यक आहे.”