हेलिकॉप्टरसाठी ६.६५ कोटी मंजूर करा

हिंगोली : जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने चक्क हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी बँकेकडे कर्जाची मागणी केली आहे. तसा लेखी अर्ज त्यांनी भारतीय स्टेट बँकेकडे दिला. कैलास पतंगे असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. सध्या सर्वच व्यवसायात स्पर्धा आहेत. आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे निराशेखेरीज शेतीमधून काहीच उत्पादन पदरी पडत नाही. कष्ट करूनही शेतकरी अडचणीत येत आहेत. अनेकजण शेतातच राबतात; अपयशानंतर आगामी हंगामात यश मिळेल अशी आशा प्रत्येक शेतकऱ्यांला आहे. मात्र, शेती व्यवसाय बदलून दुसरा व्यवसाय सुरू करण्यासाठी पतंगे यांनी सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील भारतीय स्टेट बँकेकडे चक्क सहा कोटी ६५ लाखाचे कर्ज मागितले आहे. आता, बँक काय प्रतिसाद देते, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
( वार्ताहर : शिवशंकर निरगुडे, हिंगोली )

***

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!