डासाळा सोसायटीवर ‘मविआ’चे वर्चस्व

परभणी : सेलू तालुक्यातील डासाळा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेवर महाविकास आघाडीने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. महाविकास आघाडीचे तेरा पैकी अकरा उमेदवार विजयी झाले.‌ सेलू सोसायटीच्या चेअरमनपदी नगरसेवक अविभाऊ शेरे यांची निवड झाली. नवनिर्वाचित उमेदवारांचा खासदार संजय ऊर्फ बंडु जाधव यांच्या हस्ते रविवारी सत्कार करण्यात आला. या वेळी शिवसेनेचे सेलू-जिंतूर विधानसभा प्रमुख तथा जि.प.गटनेते रामनाना पाटील, बाजार समितीचे मुख्य प्रशासक रणजित गजमल, शहरप्रमुख मनिष कदम, विठ्ठल महाराज कारके, युवासेना उपजिल्हाप्रमुख पवन घुमरे, तालुका प्रमुख अतुल डख, काशिनाथ घुमरे, गुलाब खेडेकर आदींची उपस्थिती होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!