सेलू : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त श्रीराम प्रतिष्ठान व आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातर्फे प्रिन्स इंग्लिश सी.बी.एस.ई स्कूल परिसरात मंगळवारी आयोजित कार्यक्रमात उत्साह दिसून आला.
प्रतिष्ठानचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, आर्ट ऑफ लिव्हिंगचे राज्य समन्वयक पुरुषोत्तम वायाळ, योग प्रशिक्षक कैलास कदम, किशोर घडे, हरीश चेचेडिया, सचिव डॉ.सविता रोडगे, प्राचार्य कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर, डॉ.मीनाक्षी रत्नपारखी, प्रा.अशोक बोडखे, मुख्याध्यापिका शालिनी शेळके आदींची प्रमुख उपस्थिती होती.
शारीरिक व मानसिक आरोग्य सदृढ राहावे, यासाठी दैनंदिन जीवनात नियमित योग, प्राणायाम अभ्यास आवश्यक आहे, असे वायाळ यांनी या वेळी सांगितले. संस्थेच्या विविध घटक संस्थांतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन डिगांबर टाके, तर बोडखे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
शारीरिक व मानसिक आरोग्य सदृढ राहावे, यासाठी दैनंदिन जीवनात नियमित योग, प्राणायाम अभ्यास आवश्यक आहे.
पुरुषोत्तम वायाळ, राज्य समन्वयक आर्ट ऑफ लिव्हिंग
***