परभणी : तुमच्याकडे एखादी जुनी सायकल असल्यास थोडी दुरुस्ती करा आणि ती सायकल गरजू विद्याथर्थ्यांसाठी आमच्याकडे द्या, असे आवाहन परभणीकरांनी केले आहे. ही हाक गरजू शालेय विद्यार्थ्यांच्या पायपीटला ब्रेक लावण्यासाठी देण्यात आली आहे.
करोनाच्या आपत्तीने सर्वसामान्य नागरिक अक्षरश: होरपळून निघाला आहे. यंदा पंधरा जूनपासून शाळा गजबजल्या. चिमुकल्यांनी प्रसन्न मनाने पाठीवर दप्तर घेऊन शाळा गाठली; परंतु महागाईने आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या नागरिकांसमोर पाल्याचा प्रवेश, गणवेश, शुल्क आणि शैक्षणिक साहित्य खरेदी प्रश्न उभा राहिला. या पालकांना व गरजवंत विद्यार्थ्यांना आपण सामाजिक बांधिलकी, समाजभान म्हणून आधार देणे अत्यंत गरजेचे आहे.
त्यासाठी ज्यांच्या घरी सायकल असेल आणि ती वापरता नसेल अशा सायकली सायकली सुस्थितीत करुन किंवा नवीनही सायकल संकलित करून दररोज पायपीट करीत शाळा गाठणाऱ्या गरजवंत विद्यार्थ्यांना वितरित केल्या, तर समाधानाचा आनंद नक्कीच मिळेल, या हेतूने हे अभियान राबवण्यात येत आहे.
सायकल तीस जूनपर्यंत पोहोचवावी. किंवा आम्ही ती संकलित करु. त्याचे गरजू विद्यार्थ्यांना छोटेखानी कार्यक्रमाद्वारे वितरण करू आणि पर्यावरणपूरक कामही करू, अशी साद घालण्यात आली आहे. या मोहिमेसाठी संतोष धारासूरकर, बंडू पाचलिंग, प्रमोद वाकोडकर, संजय मंत्री, श्रीधर देशमुख, प्रवीण देशमुख, गणेश देशमुख, शंकर आजेगांवकर, मधुकर गव्हाणे, अजय गव्हाणे, उमेश गिल्डा, भिमराव वायवळ, लक्ष्मीकांत क्षीरसागर, बंडू जोशी, नवनीत पाचपोर, शिरीश जयपूरकर, प्रा. अभिजित जोशी, प्रितम चक्रवार, मोहन कुलकर्णी, राजेश धारवाडकर, शुभम जाधव, संजय पांडे यांनी सहभाग दर्शवला आहे.
छतावर, गॅलरीत, जिन्याखाली, कंपाऊंडच्या कोपार्यामध्ये किंवा अन्यत्र घरा दारात कुठेही. धुळीने माखलेली, गंज चढत असेलेली, टायर चिरलेली जुनी किंवा नवी सायकल आहे ? निश्चितच… नक्की कुणाची तरी वाट पाहात आहे ती. नो टेन्शन. थोडी दुरुस्त करा आणि शिक्षणासाठी पायपीट करणार्या विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर हसू खुलविण्यासाठी तैयार व्हा.
मोहिमेच्या अधिक माहितीसाठी संतोष धारासूरकर 9881300515, प्रमोद बल्लाळ 9420878333, आशिष चिटणीस 7588081521, अक्षय जमधाडे 9579907198 दिलासा परिवार, परभणी यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.