सेलूतील ओबीसींची बुधवारी बैठक

सेलू : ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात १८ जुलै रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय मोर्चाच्या पूर्व तयारीसाठी सेलू तालुक्यातील ओबीसी बांधवांची व्यापक बैठक बुधवारी, सहा जुलै रोजी आयोजित करण्यात आली आहे.

येथील शासकीय विश्रामगृहात सोमवारी प्राथमिक बैठक झाली. ओबीसी नेते नानासाहेब राऊत अध्यक्षस्थानी होते. बैठकीत मोर्चाच्या नियोजनाबाबत विचारविनिमय करण्यात आला. या संदर्भात बुधवारी, सहा जुलै रोजी दुपारी बारा वाजता हिंदी-मराठी ग्रंथालयात व्यापक बैठक आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ओबीसी नेते उपस्थित राहून बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीसाठी सेलू तालुक्यातील ओबीसी बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!