परभणी : औरंगाबाद येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित सेलू येथील न्यू हायस्कूलच्या निमंत्रित सदस्यपदी उद्योजक ब्रिजगोपाल रामप्रसाद काबरा यांची निवड करण्यात आली आहे. मंडळाचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण यांनी याबाबतचे पत्र दिले आहे. निवडीबद्दल शालेय समितीतर्फे काबरा यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी अध्यक्ष अशोकराव काकडे, सदस्य संतोष कुलकर्णी, मुख्याध्यापक विनोद पाटील, पर्यवेक्षक धनंजय भागवत, दिनकर नखाते आदींसह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.