आषाढीनिमित्त प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये पालखी सोहळा

सेलू : येथील श्रीराम प्रतिष्ठान संचालित एलकेआर रोडगे प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूल व कॉलेजमध्ये आषाढी एकादशीनिमित्त शनिवारी ( ९ जुलै) सांस्कृतिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.

या सोहळ्यात बालवारकर्‍यांनी श्रीविठ्ठल, विविध संतांच्या वेशभूषेत टाळ, मृदंग, चिपळ्यासहित पंढरपुरवारीचे साक्षात दर्शन घडविले. अभंगांनी वातावरण चैतन्यमय झाले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, सारंगधर महाराज रोडगे यांनी या वेळी मार्गदर्शन केले. प्राचार्य प्रगती क्षीरसागर उपस्थित होत्या. यशस्वीतेसाठी मिलिंद खंदारे, विलास शेरे, अरविंद वाटुरे, वंदना खरावणे, अश्विनी हिबारे आदींसह शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

 

***

 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!