सेलू (जि.परभणी) : तालुका ‘संस्कारभारती’च्या अध्यक्षपदी गंगाधर कान्हेकर, उपाध्यक्षपदी डाॅ. राजेंद्र मुळावेकर, तर सचिवपदी डाॅ. विलास मोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. संस्कारभारतीचे प्रांताध्यक्ष डाॅ.जगदीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सेलू तालुका कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली. संगीतविधा म्हणून पंडीत यशवंतराव चारठाणकर, महिला प्रतिनिधी म्हणून सीमा कान्हेकर, सुरेखा रामदासी, तर सदस्य म्हणून अमोल जोशी यांचा नवनिर्वाचित कार्यकारिणीत समावेश आहे. याप्रसंगी गुरूपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. दीपप्रज्वलन करून ध्येय गीताने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. या वेळी आयोजित भजनसंध्येने उपस्थितांची मने जिंकली.