परभणी : १६ जुलै जागतिक टेनिस व्हॉलीबॉल दिन व टेनिस व्हॉलीबॉल खेळाचे जनक डॉ व्यंकटेश वांगवाड यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने बेंगळुरू (कर्नाटक) येथे दि.१६ ते १८ जुलै दरम्यान टेनिस व्हॉलीबॉल फेडरेशन कप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. टेनिस व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडिया व कर्नाटक असोसिएशनच्यावतीने या स्पर्धा घेण्यात येत आहेत.
स्पर्धेत भारतातील निवडक संघांना आंमत्रित करण्यात आले आहे. यात महाराष्ट्र, केरळ, पाँडेचरी, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, गुजरात, ओडिसा यांच्या वरीष्ठ व युवक संघांचा समावेश आहे.
महाराष्ट्र संघ : वरिष्ट पुरुष गट : प्रफुल्लकुमार बनसोड, गणेश कडाले, राहुल पेटकर, चंद्रशेखर ताटे, प्रवीण कोरडे, सिद्धांत लिपणे प्रशिक्षक: आशिष ओबेरॉय, मिश्र दुहेरी वरिष्ट गट : विनायक वाघमारे, पूनम खांडेकर, महिला गट : निकिता थावरे, नीता थावरे, पुनम काळे, रिद्धी खरोटे, प्राची कडाने प्रशिक्षक : राजू सोनपसारे, युवक गट : नीलेश माळवे, चैतन्य नवाड, निनाद रहाटे, प्रमोद कोरडे, कृष्णा केशरखाने, श्याम डोंगरे, प्रशिक्षक : सतिश नावाडे, युवती गट : प्रणिता थावरे, रूपाली साखरे, वैष्णवी तावडे, ऋतुजा दहातोंडे, प्रशिक्षक : संजय ठाकरे.
डॉ.व्यंकटेश वांगवाड, आनंद खरे, डॉ रितेश वांगवाड, सुरेश रेड्डी क्यातमवार, गणेश माळवे, किशोर चौधरी, धर्मविरसिंग जडेजा, नागेश्वर राव, गंगाधर स्वामी, प्रा.नंदकिशोर देशपांडे, डॉ.आबासाहेब सिरसाठ आदींनी सर्व संघातील खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.